logo

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री हे उद्योजकता मेळाव्याच्या निमित्ताने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमारे (गुरुजी) यांचे सत्कार,

कवठे महांकाळ :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमारे (गुरुजी) यांना महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला त्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री हे उद्योजकता मेळाव्याच्या निमित्ताने कवठेमहाकाळ येथे आले असताना त्यांच्या हस्ते वाघमारे गुरुजी यांचा सत्कार फेटा, शाल, सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला बहुजन व दलित चळवळीतील एका सच्चा कार्यकर्त्याला हा पुरस्कार मिळाल्याने आपल्याला मनस्वी आनंद होत आहे पॅंथरच्या चळवळीपासून अनेक आंदोलन मोर्चे व गोरगरिबांना मदत करण्यामध्ये वाघमारे गुरुजींचा हातखंडा आहे या पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आहे त्याचा मला आनंद आहे असे उद्गार रामदास आठवले यांनी यावेळी काढले यावेळी माजी सरपंच सौ बबुताई वाघमारे ,माजी नगरसेवक व विरोधी पक्षनेते लालासाहेब वाघमारे, आरपीआयचे युवा नेते विनोद निकाळजे,नाना वाघमारे, तालुका अध्यक्ष पिंटू माने, राज्याचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे ,सुरेश बारसिंग ,जगन्नाथ ठोकळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मेळाव्या जवळपास सांगली जिल्ह्यातून 2000 युवक सहभागी झाले होते

0
516 views